प्रेम कविता


प्रेम कविता

*मनातल्या मनात तू ही कित्येक स्वप्ने रंगवत असशील
माझ्याच विचारात या स्वप्नांच्या जगात हरवत असशील
माझ्या सहवासाचे क्षण आठवून रात्र-रात्र जागत ही असशील
'माझेही तुझ्यावर प्रेम आहे रे कळत का नाही तुला 
असेच म्हणत असशील ना...माझ्या विरहात तू ही जळत असशील ना... *
--------------------------------------------------------------------------------------------



*प्रेम... एक छान संवेदना....
त्यात तुझ्या नि माझी गुंतल्या भावना,
प्रेम... वाळक्या लाकडाला फुटलेली नवी पालवी..
माझी प्रत्येक रात्र तुझ्या आठवणीत जावी...
प्रेम... निर्जल झऱ्याला आलेली पाणवल..
तुझ्या माझी प्रेमाचे फुललेले प्रेम फुल..
प्रेम... ओसाड जमिनीवर आलेली एक हिरवळ ...
तुझ्या माझ्या प्रेमाची अशीच फुलत राहो कातरवेळ.. *
------------------------------------------------------------------------------------------

* यात माझा काय गुन्हा


माझ्या मनाने तुझ्यावर प्रेम केले यात माझा काय गुन्हा
जाताना डोळ्यात अश्रू देवून  गेलीस यात तुझा काय गुन्हा.


वाहणारे हे अश्रू होते मात्र आठवणी तुझ्या होत्या
उमललेल्या फुलांच्या पाकल्याच शिल्लक होत्या.
-------------------------- यात माझा काय गुन्हा


सुंगधीत फुलांचा सुगंधच शिल्लक नव्हता
डोळ्यासमोर मात्र अश्रूंचा पहाड उभा होता,
------------------------ यात माझा काय गुन्हा


 पंख विरहीत पाखराला उडता येत नाही
 तुझ्या आठवणीमुळे मग जगणे हि कठीण होई
------------------------- यात माझा काय गुन्हा


मनात तुझ्या आठवणीचे काहूर दाटून येते
नकळत डोळ्यातून  अश्रू वाहू लागते.
-------------------- यात माझा काय गुन्हा * 
---------------------------------------------------------------------------------- 
* विसरून गेलीस तू तरी विसरू शकत नाही तुजला
विसरतो का कधी किनारा आपल्या विस्तीरण सागराला


तुज्या आठवणीमुळे जेंव्हा डोळे भरून येतात
जसे निळ्या शुभ्र आकाशात मेघ दाटून येतात


भरलेल्या डोळ्यामधुनी थेंब बनुनी पाझरत राहतात
थेंब थेंब पाझरुनी पाणी बनुनी वाहू लागतात


आठवणीच महापूर कसा थांबेल कळत नाही
एक आली कि तिच्यामागून दुसरी सर येतच राही


आठवणीच्या लाठा बनुनी मनात उसळू लागतात
क्षणभर का होईना समुद्र किनार्र्याची भेट घडवतात.
समुद्र किनार्र्याची भेट घडवतात. *  
------------------------------------------------------------------------------

*माझ्यापेक्षा तुझ्यात रमून जाने मला पसंद आहे
तुझ्या डोळ्यात रमून जाण्यात एक वेगळाच आनंद आहे.


तुला हसवण्यापेक्षा तुला रडवणे मला पसंद आहे
मिट्टीत घेवून तुला समजावण्यात एक वेगळाच आनंद आहे.


तुझ्या होकाराला नकार देणे मला पसंद आहे
तुला रागवलेली पाहण्यात एक वेगळाच आनंद आहे.


माझ्यापेक्षा तुला सुखी ठेवणे मला पसंद आहे
तुझ्या सुखात आपले सुख समजण्यात एक वेगळाच आनंद आहे.


तुझ्यापेक्षा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहणे मला पसंद आहे
वाहणारे अश्रू थांबवण्यात एक वेगळाच आनंद आहे. * 
---------------------------------------------------------------------------------- 
*जमेल का तुला माझ्याविना एकटे जिवन जगायला
जेंव्हा उघडे नसतील डोळे माझे हे जग पाहायला.


तुझ्या आठवणीत मी एकदा तरी येईल का
जिवनामध्ये तुझ्या महत्व माझे असेल का.
----जमेल का तुला माझ्याविना एकटे जिवन जगायला


थांबतील का पाऊले तुझी वाटेवरून चालताना
रखरखत्या उन्हामध्ये सावली कुठेच नसताना.
---- जमेल का तुला माझ्याविना एकटे जिवन जगायला


येणार कशी पालवी वाळलेल्या झाडांना
थांबतील कसे अश्रू थांबवणारे कोणी नसताना.
----जमेल का तुला माझ्याविना एकटे जिवन जगायला


आठवणीत जेंव्हा अश्रू लागतील डोळ्यातून तुझ्या वाहयला
पाऊस बनून यावे लागेल मला अश्रू तुझे लपवायला.
---जमेल का तुला माझ्याविना एकटे जिवन जगायला *        


प्रेम कविता
                    



Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts Plugin for WordPress, Blogger...